शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्णबधिर बालकेही बोलणार-प्रत्येक बालकास लाख रुपये मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:19 IST

कोल्हापूर : कर्णबधिर व बौद्धिक विकलांग बालकांचे शीघ्र निदान करून (अर्ली एन्टेरव्हेंशन) त्या बालकांवर लहानपणीच योग्य उपचार करणाऱ्या योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देशीघ्र निदान योजना मंजूर :

विश्वास पाटील ।कोल्हापूर : कर्णबधिर व बौद्धिक विकलांग बालकांचे शीघ्र निदान करून (अर्ली एन्टेरव्हेंशन) त्या बालकांवर लहानपणीच योग्य उपचार करणाऱ्या योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत त्यावरील उपचारासाठी लाख रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच मंजूर निधीतील ९० टक्के रक्कम खर्च करणाºया शासनाचे अपंग कल्याणाच्या क्षेत्रातील हे नवे पाऊल मानले जात आहे. या योजनेचेच नाव ‘होय, कर्णबधिर बालक बोलू शकतात...’ असे आहे.

राज्य शासनाची अपंग कल्याणासाठीची वर्ष २०१६-१७ मधील अर्थसंकल्पीय तरतूद ५१३ कोटी रुपयांची आहे. त्यातील ९० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर व वेतनेतर अनुदानावर खर्च होते. निधीचे हे वितरण पूर्णत: एकांगी आहे. सध्या अपंगत्वाचे प्रतिबंधन, पूर्वप्रतिबंधात्मक निदान यासाठीच्या अपंगत्वाला अटकाव करण्यासाठीच्या कोणत्याही योजनांची शासनाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अंमलबजावणी करत नाही. त्यावर शासन एक रुपयाही खर्च करत नाही. याउलट गोवा, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये यासंबंधीचे अत्यंत प्रभावी काम झाले आहे. त्याची दखल घेऊन अपंग कल्याणात मनापासून रूची असणाºया व त्यासाठी धडपडणाऱ्या आयुक्त नितीन पाटील यांनीच ही योजना तयार केली असून शासनाकडे सादर केली. त्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याचा शासनआदेशही येत्या काही दिवसांत निघेल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या मते एकूण जन्मांच्या २ ते ४ टक्के प्रमाण हे कर्णबधिर बालकांचे तर ००.२ टक्के प्रमाण बौद्धिक विकलांग मुलांचे आहे. त्या हिशेबाने कर्णबधिर मुलांसाठी ५३ कोटी २५ लाख तर बौद्धिक विकलांग बालकांसाठी ३५ कोटी ५० लाख एवढा संभाव्य खर्च पहिल्या वर्षी अपेक्षित आहे. त्यानंतर ही रक्कम कमी होणार आहे.नव्या योजनेत पुरविण्यात येणाऱ्या सेवाजनजागृतीद्वारे लवकर निदान करून कुटुंब व पालकांचे प्रशिक्षण.वाचा उपचार सेवा. वैद्यकीय सेवा मानसिक स्वास्थ्य समुपदेशन.भौतिक उपचार सेवा पोषण आहारविषयक सल्ला.असे होते अपंगांचे ‘कल्याण’वेतन : ८९.८९ टक्के ४वेतनेत्तर : ५.६४ टक्केशिष्यवृत्ती : ०२.१३ टक्केअपंग व्यक्ती विवाह सहाय्य : १.०३ टक्केकृत्रिम अवयव : ००.०४ टक्केपुनर्वसन साहाय्य : ००.००३ टक्के